वाहनांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, December 5, 2025

वाहनांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर


           


  
अमरावती, दि. ०६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. वाहनांना नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविणे आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश दिले आहे.          

जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना, शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका यांनी त्यांच्या दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे आवश्यक असून दि. 31 डिसेंबर 2025 पूर्वी बसवून घेण्यात यावी. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने किंवा बनावट एचएसआरपी असलेली वाहनांवर भविष्यात दंडात्मक कारवाई तसेच वाहनांबाबत परिवहन कार्यालयातील कामकाज थांबविण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.



 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages