सैनिक कल्याण विभागात ७२ लिपिक पदांची भरती; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, December 18, 2025

सैनिक कल्याण विभागात ७२ लिपिक पदांची भरती;



31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत

 

अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे आणि त्यांच्या अधिपत्याखालील विविध जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांमध्ये 'लिपिक टंकलेखक (गट-क)' या संवर्गातील एकूण 72 रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

या भरती प्रक्रियेत महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेले माजी सैनिक तसेच शासन निर्णयानुसार युद्ध काळात किंवा शांततेच्या काळात सैनिकी सेवेत कार्यरत असताना शहीद झालेल्या किंवा अपंगत्वामुळे नोकरीसाठी अयोग्य ठरलेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील एका वारसदाराला पात्रतेनुसार अर्ज करता येणार आहे. एकूण 72 पदांपैकी 3 पदे किमान 40 टक्के दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली असून, दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार व गुणवत्तेनुसार ही निवड केली जाणार आहे.

 

या संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी  ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahasainik.maharashtra.gov.in यावरील 'Resources' आणि 'Recruitment' टॅबमध्ये जाऊन 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपले अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीनंतर वेबलिंक बंद होणार असून इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यांनी कळविले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages