Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात प्रबोधनपर बैठक संपन्न;

    


 शेकडो महिलांचा, विद्यार्थ्यांचा सहभाग

चांदूरबाजार(डॉ. राहुल अहिर) दिनांक ११

            तालुक्यातील शिरजगाव बंड येथे ३ डिसेंबर रोजी ६ वर्षीय चिमुकलीवर घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ चांदूरबाजार पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने मंगळवार(९ डिसेंबर) श्री संत नामदेव महाराज सभागृह, टोम्पे कॉलेज येथे मोठ्या जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला तालुक्यातील शेकडो महिला, शालेय विद्यार्थिनी, अंगणवाडी सेविका, बचत गट सदस्य, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या, पोलीस पाटील आणि पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.शिरजगाव बंड येथील घटनेनंतर महिला संघटनांनी पोलीस स्टेशनला घेराव घालून तात्काळ आरोपीला अटक करून  गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन चांदूरबाजार पोलीस ठाण्याने अवघ्या काही वेळात आरोपीला अटक करून गुन्हे दाखल केले व काही दिवसात ही जनजागृती मोहीम हाती घेतली. सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेखाताई ठाकरे ,ठाणेदार अशोक जाधव, तहसीलदार सोनम सूर्यवंशी पीएसआय उल्हास राठोड, पवन वाट, पो. कां,श्रीवास, महिला संघटक स्टेला मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखाताई ठाकरे, पोलीस पाटील राहुल उके, पोलीस पाटील हरिकिशन इंगळे, जगदंबा पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विनोद कोरडे, प्राचार्य रामटेके सर, दौ सी  काळे शाळेच्या मुख्याध्यापिका कडू मॅडम, पत्रकार संघटनेचे  शहर अध्यक्ष डॉक्टर राहुल अहिर  आदी मान्यवर उपस्थित होते.सभेत वक्त्यांनी “गुड टच-बॅड टच” चे महत्त्व स्पष्ट करून मुलींनी कोणत्याही संशयास्पद स्पर्शाबाबत त्वरित पालक किंवा शिक्षकांना सांगावे, असा संदेश दिला. लैंगिक अत्याचाराच्या घटना लपविल्यास आरोपीला प्रोत्साहन मिळते, असे मत मांडताना सर्वांनीच पालकांनी आपल्या मुलींशी मोकळेपणाने संवाद साधावा, शाळांनी नियमितपणे प्रबोधनाचे वर्ग घ्यावेत आणि समाजाने अशा घटनांविरुद्ध एकजूट दाखवावी, असे आवाहन केले.पोलीस निरीक्षक अशोक जाधव म्हणाले, “ येत्या एक-दोन दिवसात  लवकरात लवकर चार्ट शीट कोर्टाला दाखल करण्यात येईल. पण फक्त शिक्षा नव्हे, तर प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. त्यासाठीच ही जनजागृती मोहीम राबवली जात आहे. यापुढेही तालुक्यातील प्रत्येक शाळेत पोलीस दलाच्या वतीने विशेष प्रबोधन सत्रे घेतली जातील.”सुरेखाताई ठाकरे यांनी महिलांनी एकत्र येऊन अशा घटनांना आळा घालण्याचा निर्धार व्यक्त केला, तर स्टेला मॅडम यांनी बचत गट व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गावागावांत जागृती करू, अशी ग्वाही दिली.सभेच्या शेवटी उपस्थित सर्वांनी मुलींच्या सुरक्षेसाठी एकजूट राहण्याची शपथ घेतली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस पाटील संघटना, पत्रकार संघटना, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.लैंगिक अत्याचाराविरुद्ध चांदूरबाजारातून उमटलेला हा एकजूटाचा संदेश तालुक्यासह जिल्ह्यालाही दिशादर्शक ठरला आहे.


 महिलांनी हेल्पलाइनवर फोन करून पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी पोलीस हमेशा सतर्क असतात मदत करण्याकरिता तसेच पालकांनी आपल्या पल्यासोबत मैत्री साधून गुड टच बॅटच बाबत संपूर्ण माहिती आपल्या पाल्याला समजवावे जेणेकरून समाजातील असे गैरकुत्य  करणाऱ्या व्यक्ती बाबत मुलींना समज येईल पोलीस महिलांची व मुलींची मदत करण्यास सदैव तत्पर आहे.

_ ठाणेदार अशोक जाधव चांदूरबाजार

मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना मला माहित पडताच मी व स्टेला  मॅडम आणि काही महिला पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार साहेब अशोक जाधव यांची भेट घेतली असता आम्हाला खूप पॉझिटिव्ह रिस्पेक्ट दिला तसेच आरोपीला भेटू दिले तसेच पोलीस नव्हे तर एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहू वर्दीच्या पलीकडे मी सुद्धा एक माणूस आहे अशा गंभीर कृत्याला आळा बसला पाहिजे इतका मोठा प्रतिसाद ठाणेदार अशोक जाधव साहेबांनी दिला आहे . असे राष्ट्रवादीच्या सुरेखाताई ठाकरे आपल्या प्रबोधनातून सांगितले आहे

Post a Comment

0 Comments