ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, December 3, 2025

ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू


अमरावती, दि. ०४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती  ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 14 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी आशिष येरेकर यांनी कळविले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages