अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये बदल - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, November 10, 2025

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये बदल



पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती  शहरात नोव्हेंबर महिन्यात दर रविवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.

सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग

नोव्हेंबर  महिन्यातील 16 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर व 30 नोव्हेंबर  रोजी सकाळी 6 ते 8 वाजता वेलकम टी पॉईट कडून बियाणी चौकाकडे येणार एकतर्फी मार्ग सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.

वाहतूकीस पर्यायी मार्ग

            वेलकम टी पॉईट ते पंचवटी चौकपासून कांता नगर चौक किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्ग वरील वाहतूक नियमन रूग्णवाहिका, अग्नीशामक वाहन, कायाद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातुन नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.

            ही अधिसूचना माहे नोव्हेंबर 2025 मधील दर रविवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत प्रायोगिक तत्वावर अंमलात राहील.

या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages