कार्तिक स्वामी त्रिजंठा रथोत्सव तीर्थक्षेत्र शिरजगाव कसबा ला पंढरपूर चे स्वरूप - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, November 9, 2025

कार्तिक स्वामी त्रिजंठा रथोत्सव तीर्थक्षेत्र शिरजगाव कसबा ला पंढरपूर चे स्वरूप



        



शिरजगाव कसबा दिनांक १० डींगाबर सुने (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

       चांदुरबाजार तालुक्यातील तीर्थक्षेत्र 'ब' दर्जा प्राप्त शिरजगाव कसबा येथील त्रिजंठा पौर्णिमा ८ नोव्हेंबरला कार्तिक मंडळांनी रथोत्सव मिरवणूक पार पाडली आहे .महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील लाखोंच्या संख्येने भाविकांनी या रथोत्सवाला येऊन कार्तिक स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन रथोत्सवाचा आनंद लुटला आहे. या कार्तिक रथोत्सव कार्यक्रमाला २ लाखाचे वर भाविकांची उपस्थिती होती. यामुळे शिरजगाव पंढरपूर सारखे दिसत होते.

 कार्तिक स्वामी त्रिजंठा उत्सव हिंदू संस्कृतीचे प्रतीक

कार्तिक दीडीं मंडळांची समाप्ती म्हणजेच त्रिजंठा रथोत्सव  बंडींच्या चाकावर भव्य रथ उभारून त्याला झेंडूच्या फुलांनी सजविले जात आहे .येथील टाळ-मृदंगासह, ढोलकी व ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाते. रथांवर राम-लक्ष्मणाच्या बालरूपी मूले विराजमान करून सोबतच अन्य दैवीय आध्यात्मिक वेशभूषा असलेले पात्रं , अस्वल ,बजरंग बली वारकरी संप्रदाय भजन मंडळ तसेच बैलांच्या जोडीचे रथ या सर्वांमुळे लक्ष वेधले गेले आहे.जणू काही पंढरपूर महायात्रेचेच स्वरूपच या रथयात्रेला आले आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या शिरजगाव कसबा गावात एकमेव भुयारी कार्तिक स्वामी महाराजांचे मंदिर

 महाराष्ट्रातील एकमेव भुजारातील कार्तिक मंदिर शिरजगाव कसबा मध्येच आहे. 

पुरातन काळामध्ये जेव्हा शिवपार्वती व त्यांची दोन मुले कार्तिक व गणेश एकत्र बसले असतात त्यावेळेस कार्तिक लग्नाबद्दल विचारतो तेव्हा जो प्रथम पृथ्वीपरिक्रमा करेल त्याचे प्रथम लग्न लावून दिले जाईल असे शिव पार्वती सांगतात तेव्हा कार्तिक पृथ्वी परिक्रमा करायला निघतो व गणेश तिथेच थांबतो कार्तिक परिक्रमांकरुन येण्याच्या अगोदर श्री गणेश शिवपार्वतीलाच परिक्रमा करून तिथेच थांबतो ,कार्तिक आल्यानंतर शिवपार्वतीला निर्णय विचारतो तेव्हा श्री गणेशांनी प्रथम परिक्रमा केली आहे. तेव्हा प्रथम श्री गणेशाचे लग्न होईल असे सांगितले  जाते तेव्हा कार्तिक यास राग येतो व तो स्त्री जातीला शाप देतो की जी स्त्री माझा चेहरा पाहील ती स्त्री विधवा होईल यामुळे महिला कार्तिक स्वामीचे दर्शन घेत नाही परंतु   वर्षातून एकदा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी भरणी नक्षत्राला सर्व भाविक  महिलांकिरता श्री कार्तिक स्वामी महाराजांचे द्वार दर्शनकारिता खुले केले जाते या दिवशी महिलांना कार्तिक स्वामीचे दर्शन घेता येईल  अशी पौराणिक कथा आहे.

कार्तिक स्वामी मंदिरामधील कार्तिक स्वामींच्या मूर्तीचे दर्शन व प्रदक्षिणा घालून लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे .तसेच अनेक राजकीय नेत्यांनीही रथोत्सवाला उपस्थित राहून दर्शन घेतले आहे .असा हा कार्यक्रम म्हणजे पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. 

२ लाखांचे वर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.

या तीर्थक्षेत्रातील २१ कार्तिक दिंडी मंडळांनी रथ उत्सवानंतर त्या- त्या मंडळामध्ये भंडारा महाप्रसादाची व्यवस्था केलेली होती. गावातील कोणत्याच घरी या दिवशी स्वयंपाक केला जात नाही सर्व नागरिक व बाहेरून आलेले  भाविक मंडळामध्ये भोजनाचा आस्वाद घेतात आठवडी बाजाराची मंदिरांची सभागृहात ९ हजाराचे वर भाविकांनी महाप्रसादाचा  लाभ घेतला आहे. कार्तिक स्वामी प्रमुख मुख्य मंदिराचे अध्यक्ष विनायक गुर्जर, प्रकाश गुर्जर,संजोग दुधे ,अनिल संभें, सुखदेवराव अस्वार, रतन दाभाडे, सुरेश सातपुते, साहेबराव अस्वार  यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे ‌. मुख्य मंदिराचे भंडारा महाप्रसाद मध्ये सहकार्य करण्यात मनोहर सुने माजी जि. प. सभापती, मुरलीधर ठाकरे माजी जी प सदस्य, सुजित ढोबळे सरपंच रतनपुर, प्रमोद कुऱ्हाडे केंद्रप्रमुख, नंदकुमार पोकळे सीईओ पत्रकार पतसंस्था यांनी व्यवस्थापन सहकार्य केले आहे. या उत्सवामध्ये बाल अभिमन्यु मंडळाचे श्री नुर्सिंह अवताराची प्रतिकृती व वन मानुष (गोरिला/वानर) तसेच मानकर पुरा मंडळाचे आदिवासी नुत्य विशेष आकर्षण ठरले आहे.

कार्तिक स्वामी तीर्थक्षेत्र शिरसगाव कसबा चे त्रिजंठा रथोत्सव कार्यक्रमाला अमरावती,  अकोला, नागपूर व बैतूल जिल्ह्यामधूनही भाविकांनी गर्दी केल्याने गावाचे सर्व मार्ग जाम झालेले होते. गावापासून १  किलोमीटर पर्यंत  चांदूरबाजार मार्ग , परतवाडा मार्ग व बैतूल मार्गावर वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या.  संपूर्ण व्यवस्थेवर ठाणेदार महेंद्र गवई, सर्व २१ कार्तिक मंडळाचे पदाधिकारी व शांतता कमिटीचे पदाधिकारी यांचे लक्ष असल्याने मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages