केंद्रीय रस्तेनिधी मधील खरपी शिरसगाव, चांदूरबाजार मधील शिरसगाव पर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण टप्पा बहिराम यात्रे पूर्वी पूर्ण करणार. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 20, 2025

केंद्रीय रस्तेनिधी मधील खरपी शिरसगाव, चांदूरबाजार मधील शिरसगाव पर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण टप्पा बहिराम यात्रे पूर्वी पूर्ण करणार.


 डी.जी. बेल्हेकर इन्फ्रा प्रा. लि. कंपनी चे कार्य अत्याधुनिक मशीन द्वारा दिवस-रात्र सुरू

शिरजगांव कसबा :  दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): 
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील खरपी-शिरसगाव मार्गे बहिरमपूर येथील प्रसिद्ध बहिरम महाराजांच्या यात्रोत्सवापूर्वी शिरसगावपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. केंद्रीय रस्ते निधीमधून या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
बहिरम महाराजांची यात्रा ही विदर्भातील मोठी यात्रा मानली जाते आणि यात्रेदरम्यान लाखो भाविक या मार्गावरून प्रवास करतात. यात्रेला अवघे काही दिवस उरलेले असताना यात्रेतील लाखो भाविकांच्या हालचाली सुरळीत व्हाव्यात यासाठी प्रशासनाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्यासाठी प्रशासनाने हे काम प्राधान्याने हाती घेतले आहे.याच अनुषंगाने डी.जी बेल्हेकर इन्फ्रा प्रा.ली. कंपनीकडून रस्ते बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामांना अभूतपूर्व वेग देण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिराम यात्रेपूर्वी रस्त्याचा पहिला टप्पा, जो खरपीपासून शिरसगावपर्यंत आहे, त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या मुख्य मार्गासह जोडरस्त्यांवर दिवस-रात्र मशीनरी आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून, खडी टाकणे, समतलीकरण, काँग्रेटिंग करण, साइड पट्ट्यांची दुरुस्ती, भरावकाम अशी युद्धपातळीवर सुरू आहेत.  रस्ता काँक्रीटचा झाल्यामुळे भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना प्रवासादरम्यान होणारा त्रास कमी होईल. या भागातील दळणवळण अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल. काँक्रिटीकरणामुळे रस्ता अधिक काळ टिकेल आणि दुरुस्तीचा खर्च कमी होईल.यात्रेदरम्यान होणारी वाहनांची गर्दी, पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या आणि सुरक्षेचे सर्व पैलू लक्षात घेऊन रस्ते दर्जेदार व मजबुत राहावेत यावर विशेष भर दिला जात आहे.
यावर्षीच्या यात्रा व्यवस्थापनात "सुरक्षितता आणि सुविधा" हा प्रमुख केंद्रबिंदू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, ट्रॅफिक कोंडी टाळता यावी आणि आपत्कालीन सेवांना मार्ग सहज उपलब्ध रहावा यासाठी रस्ते दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे.
या रस्त्याचे काम वेळेत आणि दर्जेदार पूर्ण व्हावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे, जेणेकरून यात्रेकरूंना याचा मोठा फायदा होईल.

. 



                                                                                                                                                                                                                    

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages