शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या कर्जमंजुरी आदेशाचे वितरण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 5, 2025

शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या कर्जमंजुरी आदेशाचे वितरण





अमरावती, दि. ६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
शबरी आदिवासी विकास वित्त व विकास महामंडळ मर्यादित, शाखा कार्यालय, धारणी यांच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त योजनांच्या जाणिव जागृती पंधरवड्याच्या निमित्ताने  दि. ३ नोव्हेंबर रोजी कर्जमंजुरी आदेश वितरण करण्यात आले होते.

आमदार तथा सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक केवलराम काळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्याहस्ते लाभार्थींना कर्जमंजुरीचे आदेश वितरीत करण्यात आले. यावेळी शबरी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी श्रीराम बेलसरे, रवि सावलकर, आदित्य आडे, दिलीप भिलावेकर, गणेश दहिकर, सुनिता कास्देकर, ताप्तीपुत्र शेतकरी उत्पादक कंपनी यांना कर्ज मंजुरीचे आदेश देण्यात आले. कार्यक्रमाला शाखा व्यवस्थापक गणेश साखरे, उपप्रादेशिक व्यवस्थापक एम. आर. वानखडे, प्रकल्प समन्वयक सचिन देशमुख, कार्यकारी लेखापाल सागर शेळके आदी उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages