वडकीच्या स्मॉल वंडर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 26, 2025

वडकीच्या स्मॉल वंडर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश



राळेगाव, २७ नोव्हेंबर:
सांस्कृतिक कार्य विभाग आणि वस्तूसंग्रहालय संचालनालय, मुंबईअंतर्गत मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत राळेगाव तालुक्यातील 'स्मॉल वंडर हायस्कूल, वडकी'च्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
युनेस्कोद्वारा महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील एक अशा १२ किल्ल्यांना सामूहिक नामांकन प्राप्त झाले आहे. त्या किल्ल्यांच्या प्रचार-प्रसार कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत स्मॉल वंडर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यशस्वी विद्यार्थी
  • द्वितीय क्रमांक: वयोगट १३ ते २१ याअंतर्गत जीवतेश आशिष गवळी याने द्वितीय क्रमांक पटकावला.
  • तृतीय क्रमांक: संस्कृती सचिन शेटे हिला तिसरा क्रमांक मिळाला.
सन्मान आणि कौतुक
यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, शाळेचे चित्रकला शिक्षक पुष्पक रवींद्र महुरले यांनाही सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने प्राचार्या डॉ. मंजूषा सागर यांनी त्यांचे कौतुक केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages