अमरावती कोषागार कार्यालयात 'संकल्पातून पेन्शन मेळावा' उत्साहात संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 27, 2025

अमरावती कोषागार कार्यालयात 'संकल्पातून पेन्शन मेळावा' उत्साहात संपन्न


               अमरावती, दि.२८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती कोषागार कार्यालयामार्फत ‘संकल्पातून पेन्शन मेळावा’ वरीष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार यांचे संकल्पनेतून नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन धारकास डीजी लॉकर वापराबाबत व त्यामध्ये ई-पीपीओ, जीपीओ, सीपीओ ही सर्व कागदपत्रे कशाप्रकारे जमा करावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

 तसेच निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन वाहिनीवरील आणि तक्रार निवारण प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्यासंबंधी निवृत्तीवेतन कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी प्रशिक्षण दिले. तसेच मेळाव्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले व हयातीच्या दाखल्याबाबत माहिती देण्यात आली.

या मेळाव्यात उपस्थित झालेल्या 85 वयापेक्षा जास्त निवृत्तीवेतन धारकांचे कोषागार कार्यालयामार्फत शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना माहे नोव्हेंबर 2025 ला द्यावयाचे हयातीचे दाखले सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निवृत्तीवेतन धारकांना बँकेत जाऊन आपले नावासमोर स्वाक्षरी करावी अथवा जीवन प्रमाण या केंद्रशासनाच्या साईटवर जाऊन ऑनलाईन जीवन प्रमाण पत्र कसे अपलोड करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages