अमरावती जिल्हा नगरपरिषद निवडणूक सत्तेतील पक्ष एकमेकांविरुद्ध प्रचार करणार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, November 14, 2025

अमरावती जिल्हा नगरपरिषद निवडणूक सत्तेतील पक्ष एकमेकांविरुद्ध प्रचार करणार


अमरावती (कार्यालय)दिनांक १५ गंगा सुने  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

अमरावती जिल्ह्यामध्ये  महाराष्ट्र सत्तेतील पक्ष एकमेकांच्या विरुद्ध प्रचार करणार असल्याचे संकेत मिळालेले आहे. 

     विश्वसनीय सूत्राकडून  मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट), शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) यांचे एकत्रित एकच उमेदवार असेल तर दुसरीकडे भाजपचा उमेदवार, काँग्रेसचा उमेदवार व इतर पक्षाचे उमेदवार असेल यामुळे  यावेळेस नगरपरिषद निवडणूक मध्ये मोठी राजकीय रणधुमाळी अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे.  विधानसभा निवडणुकीमध्ये निर्माण झालेले कार्यकर्त्यांचे गट निवडणुक नंतर वरिष्ठ नेत्यांनी एकत्र करण्याचे प्रयत्न केलेले नाही. काही ठिकाणी गटांना खतपाणी घालण्याचे प्रयत्न केले गेले आहे. बंडखोर, गद्दार म्हणून हीनवणे, सामान्य कार्यकर्त्यांची कामे न होणे , कार्यकर्त्यांना उमेदवारी न देणे यामुळे काही ठिकाणी भाजपचे उमेदवारच स्व:पक्ष व  विरोधी पक्षाकडून घेरले  जाणार असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी वरच्या नेत्यांचे सर्वपक्षीय संबंध ‍ काही ठिकाणी उमेदवाराच्या विरुद्ध डमी उमेदवार देणे (एखादे नगर परिषद ला तुम्ही सहकार्य करा अमुक नगर परिषद ला मी सहकार्य करतो)असे प्रकार होऊ शकतात यामुळे स्थानिक स्वराज्य  निवडणुकीमध्ये सर्व पक्षाचे नेते कार्यकर्त्याची उणे-दुणे काढणे, गोड- गोड बोलणे. आतून क***** करणे. पाळापाळीचे राजकारण होणार आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages