हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 27, 2025

हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

 


दि .२८ पुणे:
 महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि 'हास्यसम्राट' म्हणून ओळखले जाणारे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
डॉ. बेग यांनी आपल्या विनोदी आणि मिश्कील शैलीने अनेक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. कवितेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर मार्मिक भाष्य करण्याची त्यांची हातोटी विशेष लोकप्रिय होती. 'हास्यसम्राट' या पदवीने त्यांना गौरवण्यात आले होते आणि त्यांनी ती सार्थ करून दाखवली.
त्यांच्या पार्थिवावर कालच संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना अंतिम निरोप दिला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages