विशेष :कंचनताई मुरके : साक्षात मां सरस्वतीची देण लाभलेल्या - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 17, 2025

विशेष :कंचनताई मुरके : साक्षात मां सरस्वतीची देण लाभलेल्या

 विशेष लेख,



शिरजगाव कसबा दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):

कंचनताई मुरके यांची  रोजची सकाळ एक जाणीव टवटवीत प्रसन्नतेची, एक निखळ अनुभूती सौंदर्याची, एक विश्वास स्वत:वरचा आणि एक नवी कोरी संधी  नव्याने स्वप्न साकारण्याच. त्यांची आपल्या कौशल्याने समाज परिवर्तनासाठी लिखानाची किमयाचं न्यारी. अशी आमची कंचनताई मुरके  नावंदर कुटुंबाची लेक तसेचं वैद्यकीय क्षेत्रातील मुरके कुटुंबातील सुनबाई आहेत.  त्यांच्या  वाढदिवस  निमित्ताने त्यांना माझ्या  अ.भा. ग्रा.पत्रकार संघाच्या आंतरराष्ट्रीय पदावरून शुभेच्छा देऊन कार्याला शब्द उजाळा देत आहे.

कुणाला काही प्रसन्न असते तर कुणाला कशाची देण लाभते अगदी तसचं साक्षात मा सरस्वतीची देण कांचन ताईला लाभल्याचे त्यांच्या वृत्तपत्रांमधून प्रकाशित ७००० लेखातून, १७० काव्य लेखन, ३०० भाषणे विविध कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करतांना लक्षात येते.

अहंकार बाजूला ठेवून बोलणं, निरपेक्षपणे आपल मानणं, निस्वार्थपणे मदत करणं हे मला त्यांच्यात पाहायला मिळालं.समाधानी जीवन जगणाऱ्यांपैकी त्या एक आहे कारण कधीही गोष्टीची कोणत्या तक्रार करतांना  त्यांना कधीही बघितलं नाही त्या म्हणतात वेदनांना फक्त आपणच साथीदार असतो कोणी त्यात भागीदार नसतो.

आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या मला काय करायचं आहे याचा विचार करून मी मार्गक्रमण करते कारण भी जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नव्हे तर उरलेले दिवस संपायला जन्मले आहे विचार कायम माझ्या मनात असतो असं त्या सांगतात जीवनाच्या रंगमंचावर त्यांनी लेखणी चा आधार शोधला आणि त्या जोरावर त्यांनी जीवनाला उभारी दिली आहे.

चाणक्ष वृत्ती , चौफेर अभ्यासाची आवड, बुद्धीने तल्लख, विचारांचा सखोलपणा, बोलण्यात चातुर्यता याच अनमोल ठेवा ताईकडं आहे. 

  हितगुज, जागर माँ जीजाऊंचा, मातृतिर्थ, व शाश्वत कवितासंग्रह त्यांचा प्रकाशित आहे. तर 'आवाज अतर्रमन की हा हिंदी कवितासंग्रह व गुणगौरव पुस्तक हे दोन्ही प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

त्यांनी स्वतः हाची आंतरिक गुणवत्ता निर्माण केली आहे. त्या स्वतःहाला चालता बोलता कधीचं कुणासमोर आणत नाहीतं त्यांना वृत्तपत्रांमधून, अनेक संस्थांकडून, राजकारणातून, कार्यालयांमधून काम करण्याची संधी समोर अनेकदा चालून येतात परंतू त्या नाकारतात. लेखनी माझी आवड आहे, लिखानातून बोलण्यातून प्रेरणा देणे हा माझा हेतू परंतू स्वार्थाचा जराही लवलेश मला लावायचा नाही असं स्पष्ट सांगून त्यांनी त्या संधी नाकारल्या मोजक्या बोलणाऱ्या ताई मात्र लिखानातून भरभरून बोलतं असतात.

कायम आनंदी राहण्याची कला जोपासलेल्या तर दुसऱ्याच्या दुखात सहभागी होऊन मोठेपणा जपणाऱ्या ताईंच्या पुढील लिखानाच्या प्रवासात कायमचं माझ्या शुभेच्छा त्यांच्या पाठिशी राहील.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages