बासपाणी गावात भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांच्या उपस्थिती दारू बंदी ची घोषणा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, October 9, 2025

बासपाणी गावात भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांच्या उपस्थिती दारू बंदी ची घोषणा




धारणी 
धारणी शहारा लगत असलेल्या बासपाणी  गावातील नागरिकांनी मेळघाट जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गावात दारू बंदीची घोषणा केली. गावात दारूचे होणारे दुष्परिणाम बघता दारू बंदी करणे आवश्यक झाल्याचे गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आपली प्रतिक्रिया दिली, दारू बंदीसह  गाव व्यसनमुक्त बनविण्याचा आमचा संकल्प असेल असे गावकरी बोलले, दारूमुळे अनेक कुटुंब बर्बाद झाल्याचे उदाहरणे आहे, म्हणून गावात दारू बंदीचा निर्णय घेण्यात आला. जो कोणी दारू पिऊन अथवा कोणाच्या घरी दारू आढळल्यास त्यावर विशेष दंडात्मक कार्यवाही करण्याचा निर्णय  सुध्दा गावकऱ्यानी  यावेळी घेतला, जिल्हा अध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांनी बासपानी येथील दारू बंदी निर्णय लोकहिताचे असल्याने सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले, मी जेव्हा आमदार होतो त्यावेळेस मेळघाटातील अनेक  गावात दारू बंदी  करण्यात आले होते, आता जी गावे दारू बंदी पासून वंचित आहे. त्या सर्व गावांनी तत्काळ आपल्या गावात दारू बंदी चा निर्णय घ्यावा असे आव्हान या वेळी भिलावेकर यानी केले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते, सोबतच ग्राम पंचायत सरपंच, पोलीस पाटील, आळा पटेल, भाजपाचे नेते साबुलाल जी पाटणकर, येणोरकर सर  उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages