अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, October 9, 2025

अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन




अमरावती, दि. १० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भगिनी निवेदिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अमरावती आणि दादासाहेब खापर्डे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रहाटगाव यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन पार पडले.

यावेळी खासदार बळवंत वानखडे, विश्वकर्मा लाभार्थी गजानन चिंचोळकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक अनंत सोमकुवर, संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक सुधा ठोंबरे, उपप्राचार्य संजय बोरकर, अंकुश वाशिमकर, मनीषा गुढे, श्रीमती मेंढे, भगिनी निवेदिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथील प्राचार्य राजेश शेळके, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, प्राचार्य संजय बोरोडे, वैभव भगत, दादासाहेब खापर्डे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रहाटगावचे कार्यकारी प्राचार्य सदानंद गावंडे, एस. एल. खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बडनेराचे श्री. दहीकर उपस्थित होते.

खासदार श्री. वानखडे यांनी विद्यार्थ्यांनी कर्तृत्वाने, तसेच अपार मेहनत घेऊन स्पर्धेच्या युगात कायमपणे टिकून राहण्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण व प्रशिक्षणात मेहनत घ्यावी. याचा फायदा रोजगार व स्वयंरोजगार म्हणून होणार असल्याचे सांगितले. अल्प मुदतीचे अभ्यासक्रम काळाची गरज आहे, यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

श्री. चिंचोलकर यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजना, प्रशिक्षण, बँकेतून मिळालेला कर्ज पुरवठा आणि स्वयंरोजगारातील प्रगतीची माहिती दिली. श्रीमती बारस्कर यांनी विद्यार्थ्यांची निकड ओळखून प्रशिक्षण देणे, तसेच अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले. गजानन कोरे यांनी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने राज्यात कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन केले.

अनंत सोमकुवर यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश गंडोधर यांनी सूत्रसंचालन केले. संजय बोरोडे यांनी आभार मानले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages