चांदूरबाजार दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे,अंतर्गत, ऑल महाराष्ट्र वूशु असोसिएशन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद श्री छत्रपती संभाजी नगर द्वार आयोजित यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय वूशु क्रीडा स्पर्धा ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ वुशू स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये कु. गायत्री मुकेश भोयर (-४८) वजन गटामध्ये रोप्य पदक(चांदूर बाजार), कु. काव्या देवीलाल शर्मा (-५२) वजन गटामध्ये कास्यपदक ( चांदूर बाजार),कु. हंसिका महानूर कास्यपदक (धामणगाव रेल्वे),कु सुरा अजय कोंडे (-४५) चांदूर बाजार सहभाग घेतला असून, राज्यस्तरीय शालेय वूशु स्पर्धेमध्ये चांदूर बाजार नगरीला बहुमान प्राप्त झाला आहे.
या सगळ्या मुलीनी अभूतपूर्व यशाने चांदूर बाजार आणि शिवरूप कॉम्बॅटचे नाव राज्याच्या नकाशावर चमकवले आहे.
Post a Comment
0 Comments