Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा


अमरावती, दि. 12 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे शनिवार, दि. 13 सप्टेंबर व रविवार, दि. 14 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, शनिवार, दि. 13 सप्टेंबर रोजी 3 वाजता चिखलदरा येथील पंचायत समिती सभागृहात उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मोथा येथे खवा निर्मिती करणाऱ्या बचतगटाची सभेला उपस्थित राहतील. रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता चिखलदरा येथील पंचायत समिती सभागृहात दुध उत्पादक व स्ट्राबेरी उत्पादकांच्या सभेला उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता सोईने काटोलकडे प्रयाण करतील.

0000

Post a Comment

0 Comments