'भारत जनसंग्राम पक्ष'ला निवडणूक आयोगाची नोटीस - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 5, 2025

'भारत जनसंग्राम पक्ष'ला निवडणूक आयोगाची नोटीस


अमरावती, दि. ५ : जिल्ह्यातील 'भारत जनसंग्राम पक्ष' या राजकीय पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाने गेल्या सहा वर्षांपासून, म्हणजेच २०१९ पासून, कोणत्याही निवडणुकीत उमेदवार उभा केला नसल्याने ही कारवाई करण्यात येत आहे. आयोगाने पक्षाला नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून वगळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या पक्षाला ४ सप्टेंबरपर्यंत म्हणणे सादर करावयाचे आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या कलम २९-अ अंतर्गत 'भारत जनसंग्राम पक्ष' राजकीय पक्ष म्हणून नोंदणीकृत आहे. मात्र, २०१९ पासून झालेल्या लोकसभा किंवा कोणत्याही राज्य विधानसभेच्या निवडणुका किंवा पोटनिवडणुकांमध्ये या पक्षाने कोणताही उमेदवार उभा केलेला नाही. यामुळे, हा पक्ष कलम २९-अ च्या उद्देशांसाठी राजकीय पक्ष म्हणून कार्यरत नाही, असे आयोगाचे म्हणणे आहे.

या प्रस्तावावर कारवाई करण्यापूर्वी, निवडणूक आयोगाने पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे. पक्षाला ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत आपले लेखी म्हणणे, अध्यक्षांचे किंवा सरचिटणीसांचे प्रतिज्ञापत्र, आणि संबंधित कागदपत्रे मुख्य निवडणूक अधिकारी, कक्ष क्रमांक 624, ॲनेक्स, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, १० सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईतील मंत्रालय येथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीला पक्षाचे अध्यक्ष, सरचिटणीस किंवा पक्षप्रमुख यांची उपस्थिती अनिवार्य आहे.

 पक्षाने दिलेल्या मुदतीपर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही, तर पक्षाला या प्रकरणी काहीही म्हणायचे नाही असे गृहीत धरून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages