Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

आणीबाणी मानधन योजनेमध्ये सुधारणा * अर्ज करण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत



 

अमरावती, दि. 17 : आणीबाणीच्या काळात कारावास भोगला आहे, त्यांच्यासाठी मानधन योजनेमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. त्यानुसार 24 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन निर्णयानुसार, ज्या आणीबाणी धारकांनी यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांना नव्याने अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अर्जदारांनी 15 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन पूरक पत्रासोबत असलेल्या परिशिष्ट ‘ब’ मधील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

तसेच आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती 2 जानेवारी 2018 पूर्वी हयात नसेल, तर त्यांच्या पश्चात हयात असलेले पती किंवा पत्नी मानधनासाठी अर्ज दाखल करू शकतात. आणीबाणी मानधन योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 24 नोव्हेंबर २०२५ आहे. पात्र आणीबाणीधारक आणि त्यांचे हयात जोडीदार पती, पत्नी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.


Tags

Post a Comment

0 Comments