Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीस १४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ - सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट


 

मुंबईदि. १५ : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या एक सदस्यीय समितीच्या कालावधीस 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

   

मंत्री शिरसाट म्हणालेया समितीचा कालावधी 14 सप्टेंबर 2025 रोजी संपुष्टात येत असल्यानेया समितीस प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. समितीची कार्यकक्षा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली आहे. या समितीस अनुसूचित जातींच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करणेतथ्यांची छाननी करणेउपवर्गीकरणाची आवश्यकता सिध्द करणे आणि त्यानुसार प्रारुप आराखडा शासनास सादर करण्याचे कार्य सोपविण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments