८ महिला सप्टेंबरला, विभागीय महिला लोकशाही दिन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 5, 2025

८ महिला सप्टेंबरला, विभागीय महिला लोकशाही दिन


 

            अमरावती, दि. ५ : महिला व बालविकास विभागाच्या ४ मार्च २०१३ च्या शासन निर्णयानुसार समस्याग्रस्त पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्याकरिता व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादुष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवून समाजातील समस्यासग्रस्त/पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्तस्तरावर, तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय तर दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुका स्तरावर तहसिल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात येतो.

            तरी समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सदर उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागीय उपआयुक्त विलास मरसाळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

०००००


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages