लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशनचे शहरात जल्लोषात स्वागत dt.२५.०८.२०२५ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, August 24, 2025

लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशनचे शहरात जल्लोषात स्वागत dt.२५.०८.२०२५





दक्षिण आशिया खंडात रॅलीव्दारे शांतता संदेशाचा प्रचार-प्रसार

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात मोटारसायकल रॅलीचे स्वागत व सत्कार

अमरावती, २५ : द हार्टफुलनेस ट्राय-नेशन ट्राय-सर्व्हिसेस लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशनचे दि. २३ ऑगस्टला  शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रारंभी या मोहिमेचे पंचवटी चौक येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर इर्वीन चौक स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रॅलीत सहभागी असलेल्या रायडर्स यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्… वंदे मातरम्…’ च्या जयघोषाने सभोवतालचे वातावरण देशभक्ती, राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत झाले होते.

यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंतराव वानखडे, श्रीमती कमलताई गवई, सामाजिक कार्यकर्ते लप्पीसेठ जाजोदिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह गणमान्य व्यक्ती आदी यावेळी उपस्थित होते.

ब्रिगेडीअर दिपक गौर, कर्नल डॉ. राजेश अढाऊ, लेफ्टनंट कर्नल निलेश तिवारी, विशाल चोप्रा, विशाल प्रसाद, वी.पी. भट, सजित डाफा, अभिषेक गौतम, रितेश चंदन तसेच रॅलीचे सुनियोजन करणारे राहुल पाटील, मनीषा दत्ता, शक्ती, हेमंत आदींचा या मोहिमेत सक्रीय सहभाग आहे.

संपूर्ण दक्षिण आशिया खंडात भगवान गौतम बुध्दांनी दिलेला शांततेच्या संदेशाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी तसेच शांतता प्रस्थापित होण्याच्या उद्देशाने या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित ही मोहिम नेपाळ, भारत आणि श्रीलंकेतील पवित्र बौद्ध स्थळांमधून प्रवास करणार आहे.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात दिक्षाभूमी (नागपूर) येथून शुभारंभ झाला असून अमरावती- यवतमाळ-तेलंगणा-आंध्रप्रदेश आणि बँगलोर याप्रमाणे मोटारसायकल रॅली मार्गक्रमण करणार असून सुमारे ५ हजार ६००  किलोमीटर अंतर ते पूर्ण करणार आहेत.

          मोहिमेतील सदस्यांचे रविवार, दि. २३  ऑगस्ट रोजी सकाळी बडनेरा येथे स्वागत करण्यात येणार आले . त्यानंतर ते यवतमाळकडे पुढील प्रवासासाठी रवाना झाले .


हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात मोटारसायकल रॅलीचे स्वागत व सत्कार

येथील एचव्हीपीएम मंडळात लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशन मोहिमेत सहभागी असलेल्या भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते हृद्य स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, लेडी गर्व्हनर कमलताई गवई, सामाजिक कार्यकर्ते लप्पीसेठ जाजोदिया, एचव्हीपीएम मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके, भंतेजी सारिपुत्र यांच्यासह मंडळात शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

        खासदार डॉ. बोंडे यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा स्वातंत्र्यपूर्वी पासूनचा इतिहास, विविध क्रिडा अभ्यासक्रम, येथील खेळाडुंची कारकिर्द, क्रिडा क्षेत्रात मिळविलेले प्राविण्य, देशातील प्रत्येक राज्यातून प्रवेशित विद्यार्थी आदी संदर्भात माहिती देऊन मंडळाच्या कार्यकतृत्वाचा गौरव केला.

मंडळाच्या सचिव श्रीमती चेंडके यांनी संस्थेच्या वाटचालीबाबत, खेळ उपक्रम तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या प्राविण्य याबाबत माहिती दिली. श्रीमती कमलताई गवई यांनी तथागत गौतम बुध्दांचा शांततेचा संदेश सर्वदूर पोहोचविणाऱ्या मोहिमेला व सहभागी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

            कर्नल डॉ. अढाऊ यांनी कारगिल युध्दातील स्मृतींना उजाळा देत भारतीय सैन्यातील सैनिकवीरांच्या जाज्वल्य देशभक्ती, देशप्रेमबाबत उपस्थितांना माहिती दिली. देशाची सेवा करण्यासाठी तरुण-तरुणींनी पुढाकार घेऊन भारतीय सैन्यात यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

 

लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशविषयी :

हार्टफुलनेस लॉर्ड बुद्ध ट्राय-सर्व्हिस मोटरसायकल एक्सपिडीशन ही नेपाळ, भारत आणि श्रीलंका या तीन देशांना त्यांच्या सामायिक बौद्ध वारशाच्या प्रवासात एकत्र आणणारी एक ऐतिहासिक आणि अनोखा उपक्रम आहे. या मोहिमेचे संयोजक राहुल लक्ष्मण पाटील असून त्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन (आयबीसी) आणि इतर भागीदारांच्या सहकार्याने आयोजित केली जात आहे.

या मोहिमेची सुरुवात भगवान बुद्धांचे जन्मस्थान तसेच बौद्ध धर्माच्या ऐतिहासिक प्रसाराचे प्रतीक असलेल्या लुंबिनी (नेपाळ) येथून १६ फेब्रुवारी २०२५ रोजी झाली आहे. या मोहिमेव्दारे नेपाळ, भारत व श्रीलंका या तीनही देशांमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध मजबूत होईल. या मोहिमेत नेपाळ, भारत आणि श्रीलंकेतील महत्त्वाच्या बौद्ध वारसा स्थळांचा समावेश आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages