पांढुर्णा येथील ऐतिहासिक गोटमार मेळाव्यात १००० लोक रक्तबंबाळ ! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, August 24, 2025

पांढुर्णा येथील ऐतिहासिक गोटमार मेळाव्यात १००० लोक रक्तबंबाळ !

                             ४०० वर्षाची परंपरा कायम ; २ जण गंभीर अवस्थेत नागपुर रवाना ! 


अमरावती   (प्रतिनिधी):-   दगडफेक हा तसा हिंसक प्रकार असून विदर्भातील ग्रामीण भाषेत त्याला ‘गोटमार’ असे म्हणतात. परस्परांवर दगडफेकणे हा तसा कायद्यान्वये गुन्हा आहे पण मध्यप्रदेशमध्ये असलेल्या पांढुर्णा या गावात ही दगडफेकच एक परंपरा आहे. दर वर्षी पोळ्याला परस्परांवर दगड फेकले जातात.
    ही जवळपास ४०० वर्षे जुनी परंपरा आहे. दरवर्षी भाद्र पक्षातील अमावस्या तिथीला पांढुर्णा येथील जाम नदीवर पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी असते. पोळा सणात बैलांची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी पांढुर्णा आणि सावरगाव गावातील लोक दिवसभर एकमेकांवर दगडांचा वर्षाव करतात. ज्यामध्ये शेकडो लोक जखमी होतात आणि काहींना प्राणही गमवावे लागतात. दगडफेकीच्या परंपरेला प्रेम कहानीची पार्श्वभूमी आहे.
  महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील पांढुर्णा येथील विश्वप्रसिद्ध गोटमार मेळावा ऐतिहासिक ठरत असुन मध्यप्रदेशच्या पांढुर्णा येथील गोटमारीला ४०० वर्षाचा इतिहास असून पोळ्याच्या करीला होत आलेल्या ऐतिहासिक गोटमार पाहण्यासाठी महाराष्ट्र मध्यप्रदेश यासह विविध राज्यातील लाखो नागरिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पांढुर्णा येथे दाखल होतात. जाम नदीच्या मधोमध पलाश चे झाड ताब्यात घेण्यासाठी हा खटाटोप असतो अखेर पालाश चे झाड ताब्यात घेऊन दोन पक्ष चंडीमातेचे दर्शन घेऊन गोटमार मेळावा समाप्त करतात.  
  या ऐतिहासिक गोटमारीमध्ये असंख्य भाविक रक्त बंबाळ होत असून सावरगाव व पाढुर्णा या दोन गावाकडुन एक दुसऱ्याला गोटे मारुन नदीपाञात मध्यस्थळी लावलेला झेंड्यापर्यत पोहचण्याची शर्यत असते झेंड्यापर्यत पोहचु नये म्हणुन एक मेकांना गोटे मारल्या जातात या गोटमार मेळाव्यात आतापर्यत १००० लोक जखमी झाले आहे पैकी २ लोकांना गंभीर अवस्थेत नागपुरला रेफर करण्यात आले आहे. जखमीवर उपचार करण्यासाठी ६ अस्थायी दवाखाने व ५८ डाॅक्टर व २०० कम्पाउंडर नेमण्यात आले व बंदोबस्त करण्यासाठी ६०० पोलिस तैनात करण्यात आल्याचे पांढुर्णा येथील जिल्हाधिकारी अजय देव शर्मा यांनी सांगितले. 

यंदा १००० लोक जखमी ! 
पांढुर्णा येथील पारंपारिक गोटमार उत्सवात शनिवारी सुमारे १००० लोक जखमी झाले. सकाळी दहा वाजतापासून दगडफेक उत्सवाला सुरूवात झाली. दरवर्षी प्रमाणे यंदाही गोटमार मेळाव्यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. चंडिका देवीच्या दर्शनानंतर गोटमारीला सुरूवात झाली. विशेष म्हणजे पांढुर्णा पोलीसांचे ६०० जवान येथे तैनात होते. यात जखमी झालेल्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका तैनात होत्या हे विशेष.

गोटमार परंपरा वर्षानुवर्षे पाळली जात आहे. दरम्यान एकमेकांवर दगडफेक करण्याचा हा खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाने अनेक प्रयत्न केले, मात्र आतापर्यंत प्रत्येक प्रयत्न फसला आहे. दगडांचा पाऊस थांबवण्यासाठी रबर बॉलने खेळ आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हा प्रयत्न काही मिनिटांतच उधळला गेला. गेल्या चार वर्षांपासून गोटमार बंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, हे प्रकरण मानवी हक्क आयोगापर्यंत पोहोचले. गोटमार यात्रेचा उपक्रम रोखण्यासाठी प्रशासनाची कडक तयारी होती, मात्र गोटमार परंपरा थांबवण्याचे प्रयत्न फसले.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages