Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन


अमरावती, दि. २३  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून दि. २९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विभागीय आणि जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन ‘सर्व समावेशक आणि तंदुरूस्त समाजासाठी सक्षम’ संकल्पनेवर साजरा करण्यात येणार आहे.

क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा, उपक्रम दि. २९ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. दि. २८ ऑगस्ट रोजी कॅरम, म्युझीकल चेअर, हॉकी प्रदर्शनीय सामने क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी दौड, स्क्वॅश, टेबल टेनिस, लाठी काठी, रोपस्किपींग, कराटे, किक बॉक्सींग, तर दि. ३१ ऑगस्ट रोजी सायकलींग, मल्लखांब प्रात्याक्षिक, आष्टे डु आखाडा, ऑनलाईन प्रश्नमंजुशा दि. २९ ते ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलॉईन सुरु राहणार आहे.

स्पर्धा, उपक्रमासाठी शाळेतील खेळाडू, विद्यार्थ्यांना सहभागी करुन प्रवेश अर्ज दि. २६ ऑगस्टपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे सादर करावे लागणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्सवात चालण्याची शर्यंत, मिनी फुटबॉल, टेनिस बॉल क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धीबळ, बास्केटबॉल, झुंम्बा, टॅग ऑफ वॉर, लगोरी, लंगडी, दोरी, उडी मारणे, लिंबू शर्यंत, सेक रेस खेळाचे आयोजन करुन amravatidso@gmail.com मेलवर अहवाल सादर करावा, तसेच fitindia@gov.in या ई-मेल वर नॅशनल स्पोर्ट डे या नावाने फिट इंडिया पोर्टलवर कार्यक्रमाचे फोटो, व्हीडीओ, अपलोड करावेत.

सदर उपक्रमात सहभाग घेण्यासाठी क्रीडा अधिकारी त्रिवेणी बांते, संपर्क क्रमांक 9975590232 यांच्याशी संपर्क साधावा. क्रीडा दिनानिमित्य शाळा, महाविद्यालय, संस्था, मंडळांनी विविध उपक्रमाचे आयोजन करावे, त्याचा अहवाल कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments