Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

पत्रकार सहकारी पतसंस्था, विदर्भ शेतकरी प्रोडूसर कंपनी व कार्तिक स्वामी मंडळ शिरजगाव कसबा आयोजित कार्तिक बळीराजा सुदृढ बैल जोडी स्पर्धा संपन्न



          शिरजगाव कसबा दिनांक २३ (डिंगाबर सुने)

     भारतीय परंपरेनुसार शेतकऱ्याला पुरातन काळापासून महत्व दिल्या  गेले आहे. यातच शेतकऱ्याचा जोडीदार शेतात राबणारी बैलजोडी तिचे पूजन व्हावे व शेतकऱ्याचा सन्मान व्हावा या उद्देशाने शिरजगाव कसबा आठवडी बाजारात दरवर्षी प्रमाणे सुदृढ बैलजोडी स्पर्धा संपन्न झाली आहे.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि प सभापती मनोहर सुने होते तर प्रमुख अतिथी प्रवीण खेरडे सरपंच, श्यामसुंदर राठी माजी सरपंच, प्रकाश गुर्जर संचालक जनता बँक , अशोक याऊल संचालक पत्रकार पतसंस्था, प्रमोद कुऱ्हाडे केंद्रप्रमुख जि प शाळा उपस्थित होते. किशोर गणपतराव बदुकले यांचे कुटुंबाचे वतीने दरवर्षी बैलपोळ्याचे पूजन करून उपस्थित शेतकऱ्यांचे  सुदृढ निरोगी बैलजोडी, सजावट, वेळेच्या आत तोरणाखाली उपस्थिती व इतर बाबीचे निरीक्षण समितीने निरीक्षण करून निकालाद्वारे प्रथम क्रमांक अमित राठी, द्वितीय क्रमांक दीपक चौधरी ,तृतीय क्रमांक अतुल कविटकर, चतुर्थ क्रमांक विनोद पर्डिकर, पाचवा क्रमांक अमन दुबे यांच्या बैल जोडी चे पूजन करून भेटवस्तू देऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. 

    शिरसगावातील  ५ गोविंदा दहीहांडी पथक युवकांचाही सत्कार करण्यात आलेला आहे. भेटवस्तू पारितोषिक देणाऱ्यांमध्ये मनोहर सुने, प्रवीण खेरडे, गजानन बेहेरे प्रकाश गुर्जर, किशोर बदुकले, वसंत दाभाडे , भोला निचत यांचे सहकार्य लाभले आहे. निरीक्षण समितीमध्ये संजय कोसे, साहेबराव अस्वार माजी सैनिक, बाबू पाटील पेंटर, वानखडे गुरुजी (माजी सैनिक), हे होते.

   सुदृढ बैलजोडी स्पर्धा मध्ये वेळेच्या आत तोरण रिंगणामध्ये सामील असलेल्या बैलजोडीचा परीक्षणमध्ये विचार करण्यात आलेला आहे.

कार्यक्रम आयोजनामध्ये संजोग दुधे, विनायकराव गुर्जर, सुखदेवराव अस्वार,नंदकुमार पोकळे, निलेश राजस, सुरेश सातपुते, दिलीप दाभाडे, गणेशराव पार्डीकर, जयसिंग ठाकूर, राहुल कविटकर,शुभम सातपुते यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे संचालन अशोक याऊल ,प्रमोद कुऱ्हाडे यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments