अमरावती, दि. 19 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा 68 वा वर्धापन दिन येथे शुक्रवार, दि. 8 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
राजापेठ येथे झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी अजित मासाळ होते, तर प्रमुख उपस्थिती मध्ये सहाय्यक प्रोग्रामर रविकुमार बोडखे, पणन महामंडळाचे उप-सरव्यवस्थापक दिनेश डामा, आरसीएफचे व्यवस्थापक श्री. बाविस्कर, जिल्हा कार्यालयाचे अधिकारी श्री. तिखीले व श्री. वाघमारे, प्रकल्प अभियंता श्री. भाले, श्री. अडकमोल, अंतर्गत लेखापरीक्षक के. व्ही. जोशी, बैंक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक अरविंद पतंगराव उपस्थित होते.
महामंडळाच्या सेवाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन विभाग प्रमुख अजित मासाळ यांनी केले. विभागाची कामगिरी अतिशय उत्तम असून शेतकरी वर्गाचा महामंडळाच्या गोदामात धान्यसाठवणुकीचा प्रतिसाद वाढत आहे. स्थानिक शेतकऱ्यांना वखार पावतीवर महाराष्ट्र राज्य बँकेकडून कमी व्याज दराने तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांचा कल महामंडळाच्या गोदामाकडे वाढत चालल्याचे अजित मासाळ यांनी सांगितले.
नाफेड खात्यावरील सन 2024-25 हंगामातील सोयाबीन साठ्याची मोठ्या प्रमाणात गोदामात साठवणूक करून महामंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढविल्यामुळे अमरावती विभागाचे विभाग प्रमुख अजित मासाळ यांनी केंद्रप्रमुख यांचा गौरव केला.
यावेळी मोर्शी वखार केंद्रावरील ठेवीदार शेतकरी राहुल निमकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कामिगिरीबद्दल वाशिम वखार केंद्राला उत्कृष्ट वखार केंद्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी वाशिम वखार केंद्राचे केंद्रप्रमुख प्रवीण बांगडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच दहावीमध्ये यश प्राप्त केल्यामुळे अर्णव डूमरे यांचा सत्कार करण्यात आला.
सुनील शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रप्रमुख अमोल जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पंकज मार्कंडे, स्वप्नील देऊळकर, अमोल चौधरी, चेतन मांडे, सुखदेव धर्माळे, विलास डूमरे यांनी पुढाकार घेतला.
Post a Comment
0 Comments