परदेशातील शेती अभ्यासासाठी दोन शेतकऱ्यांचे अर्ज पाठविलेच नाही
** वंचित शेतकऱ्यांनी केली तालुका अधिकारी नरेंद्र वसुकर ह्यांचेवर कारवाईची मागणी
** तालुक्का कृषी अधिकारी नरेंद्र वसुकर ह्याचा मनमानी कारभार
अंजनगाव सुर्जी दिनांक ८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना परदेशातील शेती,तेथील तंत्रज्ञान आणि उत्पादकता वाढविण्यासाठी शेती अभ्यासासाठी दरवर्षी परदेश दौरा शासनामार्फत आयोजित करण्यात येतो, यामध्ये शेतीचा दर्जा,उत्पादन क्षमता,शेती घटकाबाबत जगात होत असलेले नवनवीन बदल विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे यामागील उद्देश असून यासाठी कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी ह्या परदेश दौऱ्याचे आयोजन करण्यात येते.या दौऱ्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे व शेतकरी प्रगत व्हावा या दृष्टीने शासनाचे वतीने पात्र व इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून घेतले होते,त्यानुसार अंजनगाव सुर्जी तालुक्यामधून सात शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते, त्यामधून कृषी अधिकारी नरेंद्र वसुकर यांनी सात पैकी पाच शेतकऱ्यांचे अर्ज जिल्हा कृषी कार्यालयात पाठविले मात्र दोन शेतकऱ्यांचे अर्ज त्यामध्ये महिला शेतकरी सौ.सुनीता मनोहर मुरकुटे व रविकांत अरुण गोबरे या दोन शेतकऱ्यांचे अर्ज जिल्हा कृषी कार्यालयाकडे पाठविले नाही.ह्या शेतकऱ्यांनी सर्व कागद पत्रांची पूर्तता करून तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वसुकर यांच्याकडे दिनांक ३१ जुलै २०२५ पूर्वी अर्ज दाखल केले होते सदरच्या एकूण अर्जापैकी पात्र लाभार्थी यादी ही दिनांक ६/८/२०२५ ला लकी ड्रा द्वारे घोषित करण्यात आली व ती घोषित झाली सुद्धा परंतु सौ.सुनीता मुरकुटे व रविकांत गोबरे यांचे अर्ज हे सदरच्या पात्र लाभार्थी यादीच्या लकी ड्रॉ योजनेमध्ये तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वसुकर यांनी हेतू परस्परपणे सादर केले नसल्यामुळे सौ.सुनीता मनोहर मुरकुटे व रविकांत गोबरे यांचे वर परदेश दौऱ्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.त्यामुळे शेतकरी रविकांत गोबरे व सुनीता मुरकुटे यांनी कृषी अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दूजाभाव केल्याचा आरोप केला आहे.यावरून कृषी विभाग व संबंधित अधिकारी शेतकऱ्यांप्रती किती जागृत आहेत हे दिसून आले आहे.
*************************
याबाबत कृषी अधिकारी नरेंद्र वसुकर यांना विचारणा केली असता अर्ज ३१ ऑगस्ट ला आले नंतर सुट्टी आली,माझी तब्येत खराब होती, आणि ५ तारखेला आमच्या कर्मचाऱ्याने जिल्हा कृषी कार्यालयाच्या ईमेल वर राहिलेल्या ह्या शेतकऱ्यांचे अर्ज पाठविले व त्या कर्मचाऱ्याला डाग घेऊन प्रस्तावं घेऊन जाण्यास सांगितले परंतु त्याने तें काम केले नाही त्यांचेवर कार्यवाही करणार असे सांगितले
***********************
ह्याबाबत शेतकरी रविकांत गोबरे व सौं सुनीता मुरकुटे यांनी याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा कृषिसहसचालक,जिल्हा कृषी अधीक्षक, यांच्याकडे यांची तक्रार केली असल्याचे सांगितले आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे.
***************************
सदरचे गंभीर बाबींबाबत कृषी अधीक्षक सातपुते ह्यांचेशी संपर्क केला असता तक्रारी नुसार मी चौकशी करून दोषीनवर कार्यवाही करणार असे सांगितले
Post a Comment
0 Comments