अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय प्रतिनिधी ): महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित अमरावती मार्फत अनुसूचित जाती, नवबौध्द संवर्गातील पात्र अर्जदारांनी कर्ज, अनुदानासाठी स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. चालु आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी महामंडळाच्या मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजनेंतर्गत ९०, बिजभांडवल कर्ज योजनेंतर्गत ९० तसेच थेट कर्ज योजनेंतर्गत ४० असे एकुण २२० लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान वाटप करण्याचे उद्यिष्ट प्राप्त झाले आहे.
वरील योजनांचे अर्ज महामंडळाच्या https://mpbcdc.maharashtra किंवा https://mahadisha.mpbcdc या संकेतस्थळावर जाऊन कर्जाचे अर्ज भरण्यात यावे. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सौ. एम. ए. अवघाते यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments