Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

उपवनसंरक्षक अमरावती वन विभागाची कामगिरी


        अमरावती, दि. २३  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील तपोवन टेकडी, मार्डी रोड, तेजस विहार नगर व तपोवन परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट वारंवार नागरी वस्तीमध्ये शिरून घरातील पाळीव कुत्र्यांना उचलुन नेत असल्याची माहिती प्राप्त झालेली होती. या बाबत त्वरीत अमरावती वन विभागातील वनपरिक्षेत्र (प्रा.) वडाळी, शिकार प्रतिबंधक पथक अमरावती, मानद वन्यजीव रक्षक अमरावती जिल्हा व स्थानिक स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने सदर परिसराची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला यावेळी बिबट्याच्या सवयी, पर्यावरणातील त्याची भूमीका तसेच मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी करावयाच्या बाबींवर कार्यशाळा घेण्यात आली, तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुयोग्य ठिकाणी पिंजरे लावण्यात आले.

            दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी सदर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पशु वैद्यकीय अधिकारी यांनी सदर बिबटची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला सुरक्षित रित्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अशी माहिती अमरावती वन विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी दिली.


Tags

Post a Comment

0 Comments