Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी मनोहर सुने राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केले .

 


 चांदूर बाजार, दिनांक ७  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

३ ऑगस्ट मैत्री दिनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांना ई  मेलवर वाढदिवस शुभेच्छा पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.

     आमचे प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता त्यांनी देशांमध्ये  पहिली व एकमेव अशी पत्रकार सहकारी पतसंस्था महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा  येथे स्थापन केली आहे.पत्रकार तसेच नागरिकांनाही यामध्ये बँकेप्रमाणे सेवा दिली जात आहे.शेतकऱ्या करीता विदर्भ शेतकरी कंपनी स्थापन केली आहे.  या कंपनीमध्ये  संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे संत्रा फळे खरेदी करून देशातील मोठ मोठ्या मार्केटला पाठवीत असल्यामुळे संत्रा उत्पादकांना योग्य दर मिळत आहे.  पत्रकार सहकारी पतसंस्था व विदर्भ शेतकरी कंपनीमध्ये ते सर्वसामान्य व्यक्ती करिता लोक कल्याणकारी योजना राबवीत आहे.तसेच ते भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी असून ग्रामीण उदय  मीडिया ग्रुपचे प्रबंध संपादक आहे.



Post a Comment

0 Comments