अमरावती, दि. ७ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत सहकारी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना २०२३-२४ वर्षासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव दि. १८ ऑगस्टपर्यंत सादर करावे लागणार आहे.
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी दिलेल्या निर्देशानुसार, पुरस्कार वितरणासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पात्र सहकारी संस्थांनी पुरस्कारासाठीचे प्रस्ताव आपल्या संस्थेच्या मुख्यालयाच्या संबंधित तालुक्यातील उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात सादर करावेत. या संदर्भात अडचणी असल्यास संबंधित तालुक्याचे उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments