शिरजगाव कसबा दिनांक २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
दादासाहेब कोरडे माजी मंत्री यांचा वारसा चालवणारे प्रमोद दादा कोरडे हे कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन अचलपूर मतदार संघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये अध्यक्षीय भाषणातून केले आहे.
महाराष्ट्र शासन बी ,बियाणे महामंडळाचे अध्यक्ष तथा महात्मा फुले अर्बन को ऑप बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद दादा कोरडे यांचा वाढदिवस २५ ऑगस्टला कांडलकर सभागृह करजगाव मध्ये संपन्न झालेला आहे. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉ. चक्रधर घुलक्षे माजी जि प सदस्य ,मनोहर सुने माजी जि प सभापती,रमेश मडघे, कुंदन यादव, रुपेश ढेपे, मुरली माकोडे, विलास तायवाडे, प्रताप अभ्यंकर, सुखदेव पवार,बाळासाहेब सोनार, रमेश तायवाडे, जयसिंग ठाकूर, दादासाहेब आसरकर, कांतीलाल सावरकर, संजय थेलकर,सौ. जयश्री पंडागरे, अतुल वाठ, नंदू बर्वे, उपेंद्र बछले, गोपाल तीरमारे, हर्षल धुळे, हजर होते.
सहकार क्षेत्रामध्ये प्रमोद भाऊ कोरडे यांनी ठसा उमटवला आहे त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दादासाहेब प्रमाणे प्रमोद भाऊ त्यांचा वारसा भक्कमपणे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून कार्यकर्त्याला मोठे करीत आहे. असे प्रतिपादन आमदार प्रवीण तायडे यांनी त्यांचे भाषणातून केले आहे. तर पहीले माझा कार्यकर्ता दुसरा विषयच नाही असे परखंडपणे सांगणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रमोद भाऊ आहे असे प्रतिपादन प्रताप अभ्यंकर माजी जि प सदस्य यांनी त्यांचे भाषणात केले आहे. यावेळी बाळासाहेब सोनार ,कुंदन यादव यांची ही भाषणे झाली आहे.
अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व पत्रकार सहकारी पतसंस्थातर्फे मनोहर सुने, किरण सीनकर, प्रदीप पंडागरे, दादासाहेब आसरकर, सौ. जयश्री पंडागरे, जयसिंग ठाकूर, डॉ. अहीर, राहुल कविटकर संपादक दैनिक दिव्य क्रांती, यांनी प्रमोद दादा कोरडे यांचा सपत्नीक सत्कार केला आहे.
याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे संजय थेलकर अचलपूर विधानसभा प्रमुख यांचाही वाढदिवस असल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोनू कांडलकर ,पवन हिंगणे, अथर्व कोरडे यांनी सुयोग्य नियोजन केलेले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयस दिलीपपंत खवले यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments