अमरावती, दि. ७ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यालयाचे अधिकारी दीपक खोचे, धर्मादाय सह आयुक्त, रा. ना इंगोले, सहायक धर्मादाय आयुक्त तसेच पी. बी. तौर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी कार्यालयाचे अधीक्षक अरविंद ठाकरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी अण्णाभाऊ साठे यांना श्रद्धांजली वाहिली.
Post a Comment
0 Comments