मध्य प्रदेश बैतुल जिल्ह्यातील अतिवृष्टीचा फटका शिरसगाव कसबा गावाला मेघा नदीला आलेल्या पुराने परिसरात ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 23, 2025

मध्य प्रदेश बैतुल जिल्ह्यातील अतिवृष्टीचा फटका शिरसगाव कसबा गावाला मेघा नदीला आलेल्या पुराने परिसरात ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान




शिरजगाव कसबा  तारीख २३ ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क  (ओमप्रकाश कुऱ्हाडे)

     मध्यप्रदेश  बैतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वतीय भागात ता. १९ ला अति मुसळधार पावसामुळे मध्यप्रदेश मधून उगम असणाऱ्या मेघा नदीला त्यामुळे मोठा महापूर आला या महापुराने गावातील नदीकाठी असणाऱ्या आठवडी बाजार ,चुनारपुरा, धाकडेपुरा या भागात पुराच्या पाण्याने अनेक घर दुकानदार तसेच नदीकाठी असणाऱ्या शेतातील पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे २००७ नंतर पहिल्यांदाच हा इतक्या मोठ्या प्रमाणात मेघा नदीला महापूर आला आहे. पुराची व्यापकता पाहता महसूल तसेच पोलीस प्रशासन विभागाने नदीकाठी लोकांना सावध सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे जीवित हानी झाली नाही परंतु पुराच्या पाण्याने शिरजगाव कसबा गावातील १९ घरांमध्ये तसेच ३६  दुकानात अंगणवाडी शासकीय कार्यालय अनेक शेतात  परिसरात थेट पुराचे पाणी थेट शिरल्यामुळे  लाखो रुपयांचे परिसरातील नागरिकांची नुकसान झाले आहे. दुसऱ्या दिवशी  पुराच्या पाण्याची तीव्रता कमी झाल्यावर महसूल तलाठी कार्यालय यांनी नुकसान पंचनामे चांदूरबाजार तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात करण्यास सुरुवात केली असून नुकसान ग्रस्तांच्या दिलेल्या पंचनाम्या माहितीवरून ४० ते ५० लाख रुपयांच्या वर आर्थिक नुकसान झाल्याची माहिती परवेज पठाण महसूल मंडल अधिकारी यांनी माध्यमांना माहिती दिली आठवडी बाजार परिसरातील महसूल तलाठी कार्यालय पुराच्या पाण्याने पूर्णपणे वेडलेले होते त्यामुळे  संगणक प्रणाली कागदपत्र दस्तावेज यांचे पुराच्या पाण्याने कार्यालयात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  गावाला मेघा नदीवरील जोडणारा धाकडेपुरा येथील लहान पूल  पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली होता तर   शिरजगाव ते ब्राह्मणवाडा थडी या राज्य महामार्गावरील मोठ्या पुलावर पुराचे पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूंना वाहतूक पूर्णपणे बंद होती गावातील मेघा नदीवर असणाऱ्या मोठ्या पुलाचे सुरक्षा कठळे महापुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहे गावातील नुकसानीचा आढावा घेण्याकरिता अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे तसेच पंचायत समिती चांदुर बाजार गटविकास अधिकारी श्री वानखडे तसेच चांदूरबाजार सार्वजनिक बांधकाम उपविभाग संबंधितअधिकारी  यांनी मुख्यमार्गावरील मेघा नदीवरील पुल यांची नुकसान भागाची पाहणी केली आहे. 

    १९ ऑगस्ट ला मेघा नदी महापुराने शिरजगाव कसबा राज्य महामार्गावरील पूल जड वाहनाकरीता धोकादायक झालेला आहे. 

      आमदार प्रवीण तायडे यांच्या पाहणी  दोऱ्यामध्ये  गटविकास अधिकारी व  कृषी अधिकारी गैरहजर होते. 

         मेघा नदी महापुर संबंधी शिरसगाव कसबा सरपंच प्रवीण खेरडे /चंदन धाकडे यांची माहिती 

        १)  "माजीआमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने गावातील मेघानदीचे खोलीकरण तसेच संरक्षण भिंत कामाला प्राधान्य देऊन काम पूर्ण केल्यामुळे मेघानदी पुराच्या पाण्याला थेट गावात शिरण्यासाठी अटकावा झाल्याने गावाचे मोठे नुकसान टळले आहे"

 २) "अचानक आलेल्या महापुराने आठवडी बाजारातील माझ्या हार्डवेअर दुकानातील सिमेंट तसेच इतर साहित्यांचे जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अशी माहिती गावातील हार्डवेअर  व्यवसायिक शिवा वांगे यांनी दिली"

३) चंदन धाकडे:  मेघा नदीपात्रातील बांधलेले गावाजवळील बंधारे व  थुगाव रोडवरील लहान पूल यामुळे पाणी थोपल्यामुळे गावांमध्ये पुराचे पाणी आलेले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages