अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : द हार्टफुलनेस ट्राय-नेशन ट्राय-सर्व्हिसेस लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशनचे आज शनिवार, दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता अमरावती येथे आगमन होणार आहे. या मोहिमेचे स्वागत पंचवटी चौक येथे करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित ही मोहिम नेपाळ, भारत आणि श्रीलंकेतील पवित्र बौद्ध स्थळांमधून प्रवास करणार आहे.
या मोहिमेत सहभागी झालेल्यांचे दुपारी ३ वाजता पंचवटी चौक आगमनानंतर स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सहभागींच्या हस्ते इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आणि राजकमल चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्वांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच मोहिमत सहभागींची गुळतुला आणि धान्यतुला कार्यक्रम होतील. यावेळी उपस्थित संत मंडळी ऑपरेशन सिंदूर आणि कारगिल युद्धातील सैनिकांना आशीर्वाद देतील, त्यानंतर मोहिम हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाकडे जातील व मुक्काम करतील.
मोहिमेतील सदस्यांचे रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी बडनेरा येथे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते यवतमाळकडे पुढील प्रवासासाठी रवाना होतील.
Post a Comment
0 Comments