Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ


अमरावती, दि. ८ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या अर्ज भरण्याची अंतिम तारीख आता ४  सप्टेंबर २०२५  पर्यंत वाढवण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया पुर्ण न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

 अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या अ संकेतस्थळावरुन अर्ज डाउनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रांसह  ४  सप्टेंबर रोजी  सायंकाळी ६. १५ वाजेपर्यंत समक्ष अथवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च पथ, पुणे-०१ येथे  सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments