Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

धारणी उपविभागीय कार्यालय भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा



सहाय्यक जिल्हाधिकरी तथा उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी  पीएम श्री जि.प. मुलांच्या शाळेतील विध्यार्थांना स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा

धारणी  दि. 16 

 भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त उपविभागीय कार्यालय राजस्व  येथे  सहाय्यक जिल्हाधिकरी तथा उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर  सहाय्यक जिल्हाधीकारी जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला व तहसीलदार प्रदीप शेवाळे  यांनी पीएम श्री जिल्हा परिषद मुलांची शाळा धारणी येथील विद्यार्थ्यांसोबत मिसळून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या दिल्यात, विद्यार्थ्यांमधील शिस्त बघून समाधान व्यक्त करून कौतुक केले. राष्ट्रहित व राष्टप्रेम  जोपासण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.  यावेळी मुख्याध्याक प्रभुदास बिसंदरे,  विषय शिक्षक  शैलेश चौकसे,  सहाय्यक शिक्षक रितेश  मालवीय, बन्सीलाल कासदेकर,  नूतन गैलावर, सीमा भुजाडे आदी उपस्थित होते
ध्वजारोहणानंतर सहाय्यक जिल्हाधिकरी तथा उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments