Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाव्दारे आरोग्य शिबिराचे आयोजन 21.08.2025

                       


                              

                                              * 120 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार

        अमरावती, दि. २३ : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कार्यान्वित असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील राठी नगर स्थित इस्कॉन मंदिरात नुकतेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १२० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून आवश्यक वैद्यकीय उपचार सुविधा पुरविण्यात आली.

 विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल), राजेंद्र गोळे मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जनरपण ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आदी रुग्णालयांनी या आरोग्य शिबिरात सक्रीय सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये एकूण १२० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात जनरल मेडिसिन आजारासंबंधी ६५ रुग्ण, नेत्र विभागाचे ३८ रुग्ण, ऑर्थोपेडिक विभागाचे १७ रुग्णांचा समावेश होता. शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेतला.

 राज्यात सर्वत्र स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाव्दारे गोर-गरीब व गरजू रुग्णांना तत्काळ मदत उपलब्ध करुन देण्याचे कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कक्ष प्रमुख रामेश्वरजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असून जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात राबविले जाते, अशी माहिती अमरावतीचे कक्ष प्रमुख डॉ. श्याम गावंडे यांनी याप्रसंगी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्थापित या सहाय्यता निधी कक्षाकडून पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय मदतीचा गोर-गरीब रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कक्ष प्रमुखांनी केले आहे.

 


Post a Comment

0 Comments