अमरावती, दि. 15 ( ग्रामीण उदय प्रतिनिधी) : नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल आणि दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दि. 17 ऑगस्टच्या रात्री 12 पर्यंत कार्यालयाच्या सेवा बंद राहणार आहेत.
नोंदणी विभागाच्या सेवा दि. 14 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते दि. 17 ऑगस्ट पर्यत रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील आय-सरीता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणी या सेवांसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील. तरी संबंधित पक्षकार आणि दस्त नोंदणी करणारे व्यावसायिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अमरावती शहर क्रमांक 3 चे सह दुय्यम निबंधक जी. एम. बांते यांनी केले आहे
Post a Comment
0 Comments