अमरावतीच्या मंदारिन संत्र्यांना कांस्यपदक * ‘एक जिल्हा, एक उत्पादन-२०२४ ’ पुरस्कार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 21, 2025

अमरावतीच्या मंदारिन संत्र्यांना कांस्यपदक * ‘एक जिल्हा, एक उत्पादन-२०२४ ’ पुरस्कार


                                                        


अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय प्रतिनिधि ): जिल्ह्याने ‘एक जिल्हा, एक उत्पादन-२०२४ ’ पुरस्कारात मंदारिन संत्र्यांसाठी कृषी क्षेत्रातील अ श्रेणी अंतर्गत तृतीय स्थान मिळवले. संत्रा उत्पादनातील सातत्य, गुणवत्ता आणि बागायती क्षेत्रातील उत्कृष्ट प्रयत्नामुळे जिल्ह्याने यश संपादन केले आहे. जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी कांस्यपदकाचा पुरस्कार स्विकारला.

एक जिल्हा एक उत्पादन २०२४ अंतर्गत जिल्ह्याने चमकदार कामगिरी  केली आहे. सोमवार, दि. १४  जुलै रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’2024 पुरस्कार सोहळा पार पडला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

‘एक जिल्हा, एक उत्पादन’उपक्रम केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. यात प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देऊन जागतिक बाजारपेठेत त्याचा ठसा उमटविण्यात येत आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages