पुनीत प्रताप भंडारी यांनी CET परीक्षेत 99.2%टक्क्याची मारली भरारी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 20, 2025

पुनीत प्रताप भंडारी यांनी CET परीक्षेत 99.2%टक्क्याची मारली भरारी


              दि. २१ ( ग्रामीण उदय प्रतिनिधी) पिंपळापूर हे गाव तालुका राळेगावातील १५०० लोकसंख्या असणारे गाव आहे. या विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारचे सी ई टी चे क्लास न लावता स्वयं अध्ययना च्या आधारे पुनीत प्रताप भंडारी या विद्यार्थ्याने  CET परीक्षेत भरघोस यश प्राप्त केले आहे .त्याचे वडील प्रताप पारसमल भंडारी हे एक  शेतकरी असून पुनीत भंडारी हा शेतकऱ्याचा मुलगा असून शहराकडे पलायन करणारे विद्यार्थी,  नामांकित ठिकाणी  मोठ्या फी चा भरणा करून विद्यार्थी शिकवणी वर्ग लावतात तरीही विशेष काही करीत नाही ,तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारचे CET शिकवणी वर्ग न लावता  99.2% पुनीत भंडारी सारखे शेतकरी कुटुंबातील फार कमी विद्यार्थी दिसतात. पालकांनी पाठवलेल्या पैशांचा अपव्यय करणारी अनेक उदाहरणे आपणास  दिसतात.दुसरीकडे सोयींचा तुटवडा असूनही सर्वसामान्य परिवारातील मुले उच्च लक्ष प्राप्त करतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुनीत प्रताप भंडारी आहे, त्याच्या या यशाबद्दल गावाचे सरपंच रवींद्र चौधरी ,उपसरपंच  किशोर भाऊ नहाते, प्राध्यापक शंकर मालखेडे, माजी सरपंच वसंतराव उपाते तसेच महिला बचत गट अध्यक्ष सविता निशिकांत चौधरी यांनी  अभिनंदन व कौतुक केले. गावकऱ्यांनी पुनीतच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला  आहे. त्याच्या  यशाबद्दल स्मॉल वंडर हायस्कूल व कला वाणिज्य विज्ञान ज्यु. कॉलेज वडकी च्या प्राचार्य डॉ. मंजुषा सागर ,अहमद शेख, ,शंनो शेख,नीता फुटाणे ,विजय फुलकर , नितीन गवळी , वैभव करडे, योगिनी भोयर, दामिनी फुटाणे सह समस्त शिक्षक वर्गांनी अभिनंदन केले व भविष्यासाठी शुभेच्छा  दिल्या.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages