Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

१२ जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिन




        अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : 

                    कामगार विभागातर्फे जागतिक बालकामगार विरोधी दिन गुरूवार, दि. १२ जून रोजी साजरा केला जाणार  आहे.बालकामगारांच्या समस्येकडे लक्ष वेधणे आणि त्याचे निर्मुलन करण्यासाठी प्रयत्नाची दिशा ठरविणे शक्य व्हावे, हा या बालकामगार विरोधी दिवसाचा उद्देश आहे. जिल्ह्यातील कत्तलखाने, वीटभट्टी, खडीक्रशर, हॉटेल, दुकाने, चहाटपरी, गॅरेज आदी ठिकाणी बालकामगार कामावर ठेवण्यास कायद्याने मनाई आहे. या ठिकाणी १४  वर्षाखालील मुलांना कामावर ठेवल्यास संबंधित आस्थापना मालकाच्या विरोधात बालकामगार प्रतिबंधक व नियमन अधिनियम १९८६  आणि सुधारणा २०१६  अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असे कामगार उप आयुक्त कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments