Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आव्हानाला जिल्हा प्रशासनाचा उस्फूर्त प्रतिसाद



एक पेड माँ के नाम उपक्रम अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपण

* जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते आईच्या नावे वृक्षारोपण

* ५ जून ते १५ ऑगस्ट पर्यंत पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे

यांच्या निर्देशाने जिल्ह्यात राबविणार अनेक उपक्रम

अमरावती , दि. ६  (कार्यालय प्रतिनिधि) : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००  व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील प्रत्येकाने आपल्या घरासमोर आईच्या नावाने एक झाड लावण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  केले. या पार्श्वभूमीवर काल दि. ५ जून २०२५ ला  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी  'एक पेड माँ के नाम' अंतर्गत त्यांच्या आईच्या नावे पिंपळाचे रोप लावून वृक्षारोपण केले.

          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले. यावेळेला अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, उपजिल्हाधिकारी श्री विवेक जाधव, पालकमंत्री यांचे स्वीय सहा. विपीन पिसे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

        'एक पेड माँ के नाम'  उपक्रमात जिल्हा प्रशासनासह स्थानिक स्वयंसेवी संस्था , विद्यार्थी, सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घ्यावा.  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पर्यावरण दिना निमित्त 'एक पेड माँ के नाम' हे अभियान राबविण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. जिल्ह्याचा औद्योगिक विकास होत असताना पर्यावरणाचे संतुलन ढळू नये यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

         जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने  प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या घराच्या आवारात एक रोप लावावे. प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने वृक्षारोपण कार्यक्रम राबवावा. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १५  ऑगस्टपर्यंत उद्दिष्ट ठेवून वृक्षारोपण ड्राईव्ह कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन सद्यस्थिती जाणून घेण्यात येणार आहे. वृक्षारोपणाचे महत्त्व जाणून प्रत्येकाने यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा. येणाऱ्या पिढीला आपल्याला संतुलित पृथ्वीचा वारसा सोपवायचा आहे, असे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यावेळी म्हणाले.

           यावेळी तहसिलदार, उप विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments