Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे उद्घाटन



              अमरावती, दि. ०५  (कार्यालय प्रतिनिधि ):बँक ऑफ महाराष्ट्र व ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, अमरावती संस्थेद्वारे ३५ दिवसीय ब्युटी पार्लर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन नुकतेच  संपन्न झाले आहे. ह्यामध्ये ६० महिला सहभागी आहेत.  प्रशिक्षणाच्या उद्घाटनाला अंचल प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र व सह-अध्यक्ष महेश डांगे, महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था संचालक निखील भस्मे उपस्थित होते. 

            श्री. डांगे यांनी प्रशिक्षणार्थी यांना व्यवसायाचे महत्त्व सांगितले.  व्यवसाय करत असताना त्यामध्ये सातत्य असणे खूप आवश्यक आहे.  सकारात्मक विचार केल्यास यशाचा रस्ता मोकळा होतो सांगून उपस्थिताना मार्गदर्शन केले.  श्री. भस्मे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दीपक माहुरे यांनी मानले.                

Post a Comment

0 Comments