Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

रविवारपासून दोन दिवशीय ग्रंथालय विभागीय कार्यशाळा

अमरावती, दि. १४  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : शासकीय विभागीय ग्रंथालय आणि राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या सहाय्याने दोन दिवशीय ग्रंथालयाच्या विभागीय कार्यशाळेचे आयोजन दि. १५  आणि १६  जून रोजी शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आले आहे.

दि. १५ जून रोजी सकाळी ११ वाजता कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे हस्ते होणार आहे. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी आयएलए अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे, प्राचार्य प्रा. डॉ. देवेंद्र भोंगाडे, क्षेत्रिय अधिकारी अनंत वाघ, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे, सदस्य प्रा. चंद्रकांत जोशी सनपुरकर उपस्थित राहतील.

दुपारी १  वाजता  पहिल्या सत्रामध्ये राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजना या विषयावर क्षेत्रीय अधिकारी अनंत वाघ मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थानी यवतमाळच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन राहतील. वाशिमचे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब काळे उपस्थित राहणार आहे. दुपारी ३.३०  वाजता ग्रंथालय संचालनालयाच्या विविध योजनांबाबत छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे यांचे व्याख्यान होणार आहे. अमरावतीचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, अकोला जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शामराव वाहूरवाघ उपस्थित राहतील.

सोमवार, दि. १६ जुन रोजी दुपारी ११  वाजता राजा एलजीएमएस प्रणाली आणि ई-ग्रंथालय आज्ञावली याबाबत सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. विजयकुमार जगताप मार्गदर्शन करतील. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. महेंद्र मेटे, यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. राजेश चव्हाण प्रमुख राहतील. दुपारी १२.३०  वाजत वाचन संस्कृती, साहित्य व विकसित सार्वजनिक ग्रंथालये या विषयावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रा. डॉ. रविंद्र सरोदे, शेंदुरजनाघाट येथील श्यामाप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. राजेश बोबडे यांचे व्याख्यान होणार आहे. वाशिमचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे अध्यक्षस्थानी राहतील. अमरावती जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे उपस्थित राहतील. दुपारी २.३० वाजता शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, अंकेषण अहवाल, कार्यकारीणी बदल अहवाल बाबत मार्गदर्शन, शंका निरसन या विषयावर अमरावतीचे सहाय्यक धर्मदाय आयुक्त राजेश इंगोले यांचे व्याख्यान होणार आहे. अकोला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे अध्यक्षस्थानी राहतील. चांदुर बाजार येथील गो. सी. टोम्पे महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल राम देशपांडे उपस्थित राहतील. सायंकाळी ४ वाजता समारोपीय कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल अध्यक्षस्थानी राहतील. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार उपस्थित राहतील.

कार्यशाळेला अमरावती विभागातील शासकीय ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक तथा शासकीय विभागीय ग्रंथालयाचे प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. राजेश पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments