Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

अमरावती, दि. १४  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार, दि. २१ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. योगाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यासाठी असलेले फायदे याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, तसेच योग प्रचारासाठी दिवस साजरा केला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम सकाळी ६.३० वाजता विभागीय क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉल येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ योग प्रसारक उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, अमरावती महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, आरोग्य भारती, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, विदर्भ शासकीय ज्ञान विज्ञान संस्था, महिला पतंजली योग समिती, श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंग, क्रीडा भारती, शारीरिक शिक्षक संघटना, नेहरू युवा केंद्र, बृहन्महाराष्ट्र योग परिषद, भारत स्वाभिमान ट्रस्ट, युवा भारत व किसान पंचायत, श्री शिवाजी शिक्षण संस्था, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वंदे मातरम योग प्रसारक मंडळ, आणि जिल्ह्यातील विविध योग संघटना, खेळ संघटना संस्था, क्रीडा मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणीही योग दिन साजरा करावा, तसेच योगदिनाला नागरिकांनी पाण्याची बॉटल आणि चटई, मॅटसह विभागीय क्रीडा संकुलात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments