अमरावती , दि. १० (कार्यालय प्रतिनिधी): मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सन २०२५-२६ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र. ४, जेल रोड, अमरावती , मागासवर्गीय गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह, जेल रोड, अमरावती, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कॅम्प, अमरावती तसेच १२५ जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, विलास नगर, अमरावती येथील वसतिगृहांमध्ये शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक, अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी व वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी नोंदणी समाज कल्याण वसतिगृह येथे सुरू आहे.
सन २०२५-२६ मधील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून, ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. यासाठी विद्यार्थिनींनी वसतिगृहात नोंदणी करणे आवश्यक असल्याचे
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहप्रमुख यांनी कळविले आहे.
Post a Comment
0 Comments