Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

उच्च रक्तदाबावर नियंत्रण महत्त्वाचे: जागतिक रक्तदाब दिनानिमित्त आवाहन


अमरावती, दि. ५ (कार्यालय प्रतिनिधि ) : जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त (१७ मे) 'रक्तदाब अचूक मोजा, नियंत्रण ठेवा आणि दीर्घायुषी राहा' असे आवाहन करण्यात आले. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

जगभरात १.२८  अब्जाहून अधिक प्रौढांना उच्च रक्तदाब आहे, जो जागतिक स्तरावर एक प्रमुख आरोग्य धोका बनला आहे. विशेषतः भारतात, प्रत्येक तिसरा व्यक्ती या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आणि यातील जवळपास निम्म्या लोकांना याची जाणीवही नाही.

            जास्त मीठ, तळलेले पदार्थ, साखर, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान, मद्यपान आणि अनुवांशिक इतिहास हे उच्च रक्तदाबाचे प्रमुख जोखीम घटक आहेत. अनेकदा कोणतेही लक्षण न दिसल्याने हा आजार ओळखणे कठीण होते.

प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी च आरोग्यदायी आहार, मर्यादित व्यसने, नियमित व्यायाम, योगासने, ध्यान, आणि रक्तदाबाची नियमित तपासणी आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणेही महत्त्वाचे आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक शासकीय रुग्णालयात उच्च रक्तदाबाची तपासणी आणि औषधोपचार निःशुल्क केले जातात. ३० वर्षांवरील प्रत्येकाने आपला रक्तदाब नियमित तपासण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments