Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

सैनिकी मुलांचे वसतीगृहात माजी सैनिकांना नोकरीची संधी


अमरावती, दि. १८  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : नवसारी येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात माजी सैनिक प्रवर्गातून एक चौकीदार आणि एक सफाई कर्मचारी अशा दोन पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

सदरची पदे ही अशासकीय, तात्पुरत्या स्वरूपाचे व एकत्रित मानधनावरील आहे. माजी सैनिकास चौकीदार पद सैनिकी मुलांचे वसतीगृह, अमरावती येथे निवासी राहावयाचे आहे. इच्छुक माजी सैनिकांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रासह दि. २३  जून २०२५  पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0721-2661126 वर संपर्क साधावा. तसेच माजी सैनिक प्रवर्गातून उमेदवार प्राप्त झाले नसल्यास इतर नागरिकांना संधी देण्यात येतील, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे. 

Tags

Post a Comment

0 Comments