पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात ९६ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 20, 2025

पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात ९६ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड



अमरावती, दि. २१  (ग्रामीण उदय प्रतिनिधी ): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने नुकताच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह २) संपन्न झाला. या रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ऑनलाइन तसेच ऑफलाईन १९० उमेदवारांनी सहभाग नोंदवून त्यापैकी १४०  उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती दिल्या.  मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी ९६  उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. रिम्सचे प्रतिनिधी स्नेहा मुने, टाईम्स ग्रुपचे दिपंषु कोतांगले, एम. के किचन वेअरचे ललित डोले, प्लास्ती सर्जचे सयुजा काळे व जना फायनान्सचे अमोल भूजांडे, जाधव ग्रुप ऑफ कंपनीजचे चंद्रकांत वाघमारे उद्योजक म्हणून उपस्थित होते. मेळाव्यामध्ये सर्व खाजगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages